हनुमान चालीसा मराठी | Hanuman Chalisa Lyrics

Hanuman Chalisa Lyrics in Marathi language with meaning in Marathi. Readers, please note that Since both Marathi and Hindi are written in Devanagari script, there is no need to translate Shri Hanuman Chalisa into Marathi.


Song Details

Song TitleHanuman Chalisa | हनुमान चालीसा
SingerHariharan
MusicLalit Sen, Chander
LyricsTulsidas
Original LanguageAwadhi
Year of Creation16th century
Music LabelT-Series

Hanuman Chalisa Lyrics in Marathi with Meaning

|| दोहा ||

श्री गुरु चरन सरोज रज, निज मन मुकुरु सुधारि |
बरनउँ रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि || १ ||

श्री गुरदेवांच्या चरण कमलांच्या धुळीने माझा मनरूपी आरसा स्वच्छ करून मी श्री रघुनाथांच्या निर्मळ सुयशाचे वर्णन करू इच्छितो की जे सूयन चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहे.

बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार |
बल बुद्धि विद्या देहु मोहिं, हरहु कलेश विकार || २ ||

मी बुद्धिहीन आहे म्हणून मी त्या पवनपुत्र हनुमंताचे स्मरण करतो व त्याने मला बल, बुद्धि आणि विद्या प्रदान करावी अशी त्याची प्रार्थना करतो. माझे सर्व क्लेश दूर करावेत अशी त्याची प्रार्थना करतो.

|| चौपाई ||

जय हनुमान ज्ञान गुन सागर |
जय कपीस तिहुँ लोक उजागर || १ ||

हे हनुमंता ! तू ज्ञानाचा व शुभ गुणांचा सागर आहेस. तुझा विजय असो. हे तिन्ही लोकांना प्रकाशमान करणाऱ्या कपिराज हनुमंता तुझा विजय असो.

राम दूत अतुलित बल धामा |
अंजनिपुत्र पवनसुत नामा || २ ||

हे हनुमंता ! तू रामाचा दूत आहेस. अतुलनीय अशा बळाचे तू भांडार आहेस. अंजनी मातेचा तू पुत्र असून पवनपुत्र हे तुझे नाव प्रसिद्ध आहे.

महावीर विक्रम बजरंगी |
कुमति निवार सुमति के संगी || ३ ||

हे हनुमंता ! तू अतिशय बलवान, खुप पराक्रमी व वज्रासमान देह असणारा आहेस. तू कुबुद्धि नष्ट करणारा असून सुबुद्धि असणाऱ्यांचा साथीदार पाठीराखा आहेस.

कंचन बरन विराज सुवेसा |
कानन कुण्डल कुंचित केसा || ४ ||

हे हनुमंता ! तुझ्या शरीराचा रंग सुवर्णासमान आहे. तुझा वेष सुंदर आहे. कानात कुंडले असून केस कुरळे आहेत.

हाथ बज्र और ध्वजा बिराजै |
कांधे मूंज जनेऊ साजै || ५ ||

तुझ्या हातावर वज्र आणि ध्वजा ही शुभ चीन्हे आहेत. खांद्यावर मुंजीचे यज्ञाेपवीत शोभुन दिसत दिसत आहे.

शंकर सुवन केसरी नन्दन |
तेज प्रताप महा जग वन्दन || ६ ||

हे हनुमंता ! तू शंकराचा अवतार असून केसरी वानराच्या पोटी पुत्ररूपाने येऊन त्याला आनंद देणारा आहेस. तू तेजोमय स्वरुप व महान पराक्रमी असून सर्व विश्वाला तू वंदनीय आहेस.

विद्यावान गुनी अति चातुर |
राम काज करिबे को आतुर || ७ ||

हे हनुमंता ! तू विद्वान, गुणवान व अतिशय चतुर आहेस. रामकार्यात तू नेहमीच तत्पर असतोस.

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया |
राम लखन सीता मन बसिया || ८ ||

हे हनुमंता ! रामचरित्र श्रवणाच्या बाबतीत तू फार रसिक आहेस. श्रीराम, लक्ष्मण व सीता ह्या त्रिमूर्तींचे वास्तव्य तुझ्या ह्रदय मंदिरात असते.

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा |
विकट रूप धरि लंक जरावा || ९ ||

हे हनुमंता ! तू सीतेला तुझे सूक्ष्म रूप दाखवले होतेस व प्रचंड रूप धारण करुन लंका जाळली होतीस.

भीम रूप धरि असुर संहारे |
रामचन्द्र जी के काज संवारे || १० ||

तू भयंकर रूप धारण करुन लंकेतील राक्षसांना मारले होतेस आणि रामाच्या समस्त कार्याची धुरा सांभाळली होतीस.

लाय संजीवन लखन जियाये |
श्री रघुबीर हरषि उर लाये || ११ ||

हे हनुमंता ! तू संजीवनी नावाची बूटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले होतेस, तेव्हा भगवान श्रीरामाने प्रसन्न होऊन तुला हृदयाशी कवटाळले होते.

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई |
तुम मम प्रिय भरतहि सम भाई || १२ ||

हे हनुमंता ! तुझी थोरवी गात असता श्रीराम म्हणाले होते की तू माला माझा जो बंधू जो भरत ह्याच्या सारखा प्रिय आहेस.

सहस बदन तुम्हरो जस गावैं |
अस कहि श्रीपति कंठ लगावैं || १३ ||

हे हनुमंता ! हजार मुखे असलेला शेष तुझ्या यशाचे पोवाड़े गावों ऐसे म्हणून श्रीरामाने तुला गळामीठी घातली होती.

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा |
नारद सारद सहित अहीसा || १४ ||

सनक, सनन्दन, ब्रम्हदेव, शंकरादि थोर ॠषि, देवर्षि नारद, सरस्वती देवी, सर्पराज शेष व सर्व देवताही तुझ्या रूपाचे वर्णन करतात.

जम कुबेर दिकपाल जहां ते |
कवि कोविद कहि सके कहां ते || १५ ||

यम, कुबेर इत्यादि दिकपाल व सर्व देवतांही जेथे तुझ्या रूपाचे यथार्थ वर्णन करू शकत नाहीत, तेथे भूमीवर वास्तव्य करणारे कविं अथवा महान पंडित तुझे काय वर्णन करू शकणार?

तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा |
राम मिलाय राजपद दीन्हा || १६ ||

हनुमंता ! सुग्रीवावर तू महान उपकार केलेस. त्याची रामाशी भेट घडवून आणलीस व त्याला राज्य मिळवून दिलेस.

तुम्हरो मंत्र बिभीषन माना |
लंकेश्वर भये सब जग जाना || १७ ||

हे हनुमंता ! तू दिलेला मंत्र अर्थात गुप्त सल्ला बिभीषणाने मानला व फल स्वरुप त्याला लंकेचे राज्य मिळाले, ही गोष्ट सर्व जगाला ठाऊक आहे.

जुग सहस्र जोजन पर भानु |
लील्यो ताहि मधुर फल जानू || १८ ||

हे अंजनीसुता ! दोन हजार योजने दूर असलेला सूर्य, पण त्याला तू गोड फळ समजून गिळले होतेस.

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं |
जलधि लांघि गए अचरज नाहीं || १९ ||

श्रीरामाची अंगठी मुखात ठेवून, बा हनुमंता तू समुद्र पार केला ह्यात काही आश्चर्य नाही.

दुर्गम काज जगत के जेते |
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते || २० ||

जगातील जेवढी म्हणून कठिणातील कठीण कार्ये आहेत ती सर्व तुझ्या कृपेने सहज पार पडतात.

राम दुआरे तुम रखवारे |
होत न आज्ञा बिनु पैसारे || २१ ||

हे हनुमंता ! श्रीरामाच्या दरबाराचा तूंच द्वारपाल असल्याने तुझ्या आज्ञेशिवाय कोणीही तिथे प्रवेश करू शकत नाही.

सब सुख लहै तुम्हारी सरना |
तुम रक्षक काहू को डरना || २२ ||

हे हनुमंता ! तुला शरण येणाऱ्यांना सर्व-सुखांची प्राप्ती होते. तू ज्यांचा रक्षण कर्ता होतोस त्याने कोणाचेही भय का बाळगावे?

आपन तेज सम्हारो आपै |
तीनों लोक हांक तें कांपै || २३ ||

हे हनुमंता ! तुझे तेज तूच सहू शकतोस, पेलू शकतोस. तुझी गर्जना ऐकून तीन्ही लोकांचा थरकाप होतो.

भूत पिशाच निकट नहिं आवै |
महावीर जब नाम सुनावै || २४ ||

जी व्यक्ति हनुमंताचे नाम घेते त्या व्यक्तीच्या जवळ भुत प्रेत पिशाच्यादि कुणीही येवू शकत नाहीत.

नासै रोग हरै सब पीरा |
जपत निरंतर हनुमत बीरा || २५ ||

अशा या पराक्रमी हनुमंताचे अहोरात्र नाम घेतल्याने रोग व इतर सर्व पीड़ा नष्ट होतात.

संकट तें हनुमान छुड़ावै |
मन-क्रम-वचन ध्यान जो लावै || २६ ||

जी व्यक्ति मन, कर्म व वाणी द्वारा हनुमंताचे ध्यान करते त्या व्यक्तीला मारुती सर्व संकटातून मुक्त करतो.

सब पर राम तपस्वी राजा |
तिनके काज सकल तुम साजा || २७ ||

श्रीराम हा सर्वश्रेष्ठ ईश्वर व तपस्वी लोकांचा राजा आहे परंतु त्याच्याही कार्याची धुरा हे हनुमंता तूच सांभाळतोस.

और मनोरथ जो कोई लावै |
सोई अमित जीवन फल पावै || २८ ||

हे हनुमंता ! तुझ्याकडे अन्य इच्छा धरुन जे लोक येतात, त्यापेक्षा कितीतरी अधिक आपल्या जीवनात प्राप्त करतात.

चारों जुग परताप तुम्हारा |
है प्रसिद्ध जगत उजियारा || २९ ||

बा हनुमंता ! तुझा पराक्रम चारही युगांत प्रसिद्ध आहे. तुझे सुयश सबंध जगताला ज्ञात आहे.

साधु सन्त के तुम रखवारे |
असुर निकंदन राम दुलारे || ३० ||

हे हनुमंता ! तू साधु संतांचा रक्षणकर्ता असून दुष्टांचा नि :पात करणारा आहेस. श्रीरामाला तू अत्यंत प्रिय आहेस.

अष्ट सिद्धि नव निधि के दाता |
अस वर दीन जानकी माता || ३१ ||

हे हनुमंता ! श्री सीतादेवीने तुला असा वर दिला होता की, तुझी इच्छा असेल त्याला तू अष्टसिद्धि व नव निधि प्रदान करू शकशील.

राम रसायन तुम्हरे पासा |
सदा रहो रघुपति के दासा || ३२ ||

हे हनुमंता ! रामरूपी रसायन तर तुझ्याच पाशी आहे. तू तर निरंतर श्रीरामाचा दास बनुन राहतोस.

तुह्मरे भजन राम को पावै |
जनम-जनम के दुख बिसरावै || ३३ ||

हे हनुमंता ! तुझे भजन रामाची प्राप्ती करवून देते, एवढेच नव्हे तर जन्म जन्मांतराची सर्व दुःखे नेहमीसाठी विसरावयास लावते, नष्ट करते.

अन्तकाल रघुबरपुर जाई |
जहां जन्म हरि भक्त कहाई || ३४ ||

हे हनुमंता ! तुझा भक्त मृत्यु नंतर रामलोकि जाईल आणि यदकदाचित त्याचा जन्म झालाच तर तो पुनः भगवंताचा भक्त म्हणूनच जन्मास येईल व हरिभक्त म्हणूनच सर्वाना ज्ञात होईल.

और देवता चित्त न धरई |
हनुमत सेई सर्व सुख करई || ३५ ||

हनुमंताचा भक्त जार आपल्या हृदयात अन्य देवतानां स्थान न देता निव्वळ हनुमंताचेच चिंतन करत असेल तर तो सर्व सुखांची आनंदाची प्राप्ती करेल.

संकट कटै मिटै सब पीरा |
जो सुमिरै हनुमत बलबीरा || ३६ ||

जी व्यक्ती बलवान व पराक्रमी हनुमंताचे स्मरण चिंतन करते त्या व्यक्तीची सर्व संकटे नष्ट होतात आणि ह्या संसार सागरातूनही ती व्यक्ती सहीसलामत तरुन जाते.

जय जय जय हनुमान गोसाईं |
कृपा करहु गुरुदेव की नाईं || ३७ ||

हे हनुमंता ! तुझा विजय असो. तू माझ्या मनाचा स्वामी आहेस. तू माझ्यावर कृपावंत गुरुप्रमाणे कृपा कर.

जो शत बार पाठ कर कोई |
छूटहि बंदी महासुख होई || ३८ ||

जो कोणी ह्या हनुमान चालिसाचा रोज शंभर वेळा पाठ करेल तो सर्व प्रकारच्या बन्धनातून मुक्त होईल आणि त्याला परमानंदाची प्राप्ती होईल.

जो यह पढ़ै हनुमान चालीसा |
होय सिद्धि साखी गौरीसा || ३९ ||

जो कोणी ह्या हनुमान चालिसाचा नित्यनियमाने रोज पाठ म्हणेल त्याला निश्चित पणे यशाची प्राप्ती होईल. ह्या गोष्टीला प्रत्यक्ष्य भगवान शंकर साक्षी आहेत.

तुलसीदास सदा हरि चेरा |
कीजै नाथ हृदय महँ डेरा || ४० ||

हे हनुमंता ! हा तुलसीदास सदैव श्रीहरीचा म्हणजे तुझाच दास आहे. म्हणून हे प्रभु कृपावंत होऊन तू माझ्या हृदयात वास्तव्य कर.

|| दोहा ||

पवन तनय संकट हरण, मंगल मूरति रूप |
रामलखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ||

हे पवनपुत्र हनुमंता ! तू संकट हरण करणारा असून, आनंदरूप व मंगल स्वरुप आहेस, ह्यास्तव हनुमंता कृपावंत होऊन श्रीराम, लक्ष्मण व सीतेसह तू माझ्या हृदयात वास्तव्य कर.

Here we end this article which gives you Hanuman Chalisa in writing in Marathi with meaning.

You May Also Like

Shree Hanuman Chalisa Video

Video Credits: T-Series | Singer: Hariharan