Hartalika Aarti Lyrics and Vrat Katha | Hartalika Teej

Hartalika Teej Mon 18 Sept 2023: Hartalika Aarti Lyrics and Vrat Katha. Women do Hartalika fasting without water for the longevity and health of their husbands. Young Ladies (Kumaris) do this fast to get a good husband.

hartalika-aarti-marathi-hartalika-teej-aarti-hindi-lyrics-pdf

Hartalika Aarti Marathi Lyrics

जय देवी हरितालिके | सखी पार्वती अंबिके ||
आरती ओवाळीते | ज्ञानदीप कळिके || धृ ||

हर अर्धांगी वससी | जासी यज्ञा माहेरासी ||
तेथे अपमान पावसी | यज्ञकुंडी गुप्त होसी || १ ||

जय देवी हरितालिके…

रिघसी हिमाद्रिच्या पोटी | कन्या होसी तूं गोमटी ||
उग्र तपश्चर्या मोठी | आचरसी उठाउठी || २ ||

जय देवी हरितालिके…

तपपंचाग्निसाधने | धुम्रपाने अघोवदने ||
केली बहु उपोषणे || शुंभ भ्रताराकारणें || ३ ||

जय देवी हरितालिके…

लीला दाखविसी दृष्टी | हे व्रत करिसी लोकांसाठी ||
पुन्हा वरिसी धूर्जटी | मज रक्षावे संकटी || ४ ||

जय देवी हरितालिके…

काय वर्णू तव गुण | अल्पमती नारायण ||
माते दाखवी चरण | चुकवावे जन्म मरण || ५ ||

Tags: hartalika aarti lyrics, hartalika aarti marathi madhe, hartalika aarti pdf

Hartalika Aarti in Marathi PDF Download

You May Also Like


हरतालिका व्रत कथा मराठी

हरतालिकेची कथा मराठी मध्ये: एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं अस व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असल तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हे ही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.

हरतालिका कहाणी ऐका

हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुमची कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.

नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवा-वाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतियेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.

पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथ आले. त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

हरतालिका व्रत कसे करावे?

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.


Hartalika Teej Aarti Hindi Lyrics

जय पार्वती माता जय पार्वती माता |
ब्रह्म सनातन देवी शुभ फल कदा दाता |
जय पार्वती माता जय पार्वती माता ||

अरिकुल पद्मा विनासनी जय सेवक त्राता |
जग जीवन जगदम्बा हरिहर गुण गाता |
जय पार्वती माता जय पार्वती माता ||

सिंह को वाहन साजे कुंडल है साथा |
देव वधु जहं गावत नृत्य कर ताथा |
जय पार्वती माता जय पार्वती माता ||

सतयुग शील सुसुन्दर नाम सती कहलाता |
हेमांचल घर जन्मी सखियन रंगराता |
जय पार्वती माता जय पार्वती माता ||

शुम्भ निशुम्भ विदारे हेमांचल स्याता |
सहस भुजा तनु धरिके चक्र लियो हाथा |
जय पार्वती माता जय पार्वती माता ||

सृष्टि रूप तुही जननी शिव संग रंगराता |
नंदी भृंगी बीन लाही सारा मदमाता |
जय पार्वती माता जय पार्वती माता ||

देवन अरज करत हम चित को लाता |
गावत दे दे ताली मन में रंगराता |
जय पार्वती माता जय पार्वती माता ||

श्री प्रताप आरती मैया की जो कोई गाता |
सदा सुखी रहता सुख संपति पाता |
जय पार्वती माता मैया जय पार्वती माता ||

Tags: teej aarti lyrics, teej ki aarti, teej mata ki aarti

Hartalika Teej Aarti in Hindi PDF Download