Lal Chikhal Lyrics – Navardev (BSc Agri)

Lal Chikhal Lyrics sung by rocKsun is a New Marathi Song from the movie Navardev (BSc Agri), Written by rocKsun while the music is composed by rocKsun & Khakiee.

In this post, you will find the lyrics and the music video of Lal Chikhal Song from Navardev (BSc Agri) featuring Kshitish Date.

lal-chikhal-lyrics-navardev-bsc-agri-rocksun

Song Details

Song TitleLal Chikhal
SingerrocKsun
ComposerrocKsun & Khakiee
LyricsrocKsun
FeaturingKshitish Date
Music LabelZee Music Company
MovieNavardev (BSc Agri)
Movie DirectorRam Khatmode
Release Date26 January 2024

Lal Chikhal Lyrics in Marathi

लाल रक्त आटवूनी पिकवला माल
लाल लाल डोळ्यात पेटला या जाळ
जगाचा पोशिंदा रोज बेदखल
स्वप्नांचा होतो त्याच्या लाल चिखल

लाल रक्त लाल चिखल लाल लाल माती
नंगा नाच जिंदगीचा अन ती फुटलेली छाती
अहो रात थपका पाठीवर न माथ्यावरती काठी
गिधाडांची भरली पोट आमच्या मढ्याला नाही माती

अब्रू पापणीत निजला, सदरा घामाने भिजला
आमच्या रक्ता मासाने व्यापरांचा खिसा सजला
घरावर पडला टेंभा तरी बळीराजा पूजला
उर फुटून गेला समदा हुंदका छाताडात निजला

या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन आसवात न्हाहतो
या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो

या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन आसवात न्हाहतो
या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो

या टाचेवरच्या भेगा आमच्या कष्टाचा पुरावा
तरी व्यापऱ्याच्या तालावर आम्ही नाच का करावा
या यातनांचा टाहो कुणी कसा ऐकणार
जगात पोट भरणाऱ्याचा गळा का धरावा

आम्ही शेतीत बियाण नाही जीव पेरतो
त्या जीवाचा का किरकोळ मग भाव ठरतो
आमच्या कष्टाची किंमत का शून्य करता राव
इथ जगण्यासाठी आम्ही रोज रोज मरतो

जवा जत्रेमध्ये पोरगं करत खेळण घ्यायचा हट्ट
तवा खिशात हात घालून नुसते डोळे करतो घट्ट
रिकामा गळा बायकोचा काळजाला बीळ पाडतो
भरून आत दिसतो अंधकार काळाकुट्ट

या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन आसवात न्हाहतो
या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो

या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन आसवात न्हाहतो
या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो

आयुष्याची माती होऊन ओंजळीत पडली
हाडांची झाली राख अन ती वादळात उडली
पंचनामा पिकाचा का मढ्याचा करता आमच्या
छातीवरती हात आपटून काळी आई रडली

काळ्या पेनाची शाई काळ्या कागदावर ओतली
काळ्या रक्ताची गांठ काळ्या धमन्यात गुतली
मी टाचा खरडल्या अन वाता भरडल्या
काळ्या मातीनं हाक काळ्या नभाला घातली

किती सरकार आली किती सरकार गेली
आमच्या उरा वरती यांनी नुसता नाच केलाय
किती औषधाने गेले किती लटकून मेले
या सावकारांनी नुसता नुसता मात केलाय

उन्हा तान्हात थंडी वाऱ्याच माती मध्ये खपतो
अर्ध्या रात्री मोटार चालू कराय जीव जातो आमचा
MRP वर मॉल मध्ये शॉपिंग करता राव
अन दहा रुपयांच्या भाजी साठी जीव जातो तुमचा

जरा लाज वाटूद्या स्वतःच्या वागण्याची
स्वार्थासाठी आयुष्य हे जगण्याची
त्यात तुमची पण काय चूक तुम्ही सवयीचे गुलाम
तुम्हाला सवय झालीय चरण आमची बघण्याची

तरी शेतकरी असण्याची लाज नाही मित्रा
मला शेतकरी असल्याचा माज आहे
खांद्यावरती पेलतो अख्खा दुःखाचा डोंगर
आणि स्वाभिमानी वाघाची मिजाज आहे

Written By: rocKsun

You May Also Like

Lal Chikhal Video Song

Video Credits: Zee Music Company