Chanchal Song lyrics sung by Aanandi Joshi and Rohit Raut from Gulkand. A Marathi love song written by Mandar Cholkar and composed by Avinash-Vishwajeet. Read full lyrics in Marathi. Starring Saie Tamhankar, Prasad Oak, Samir Choughule and Esha Dey.
Song Details
🎤 Singer | Aanandi Joshi, Rohit Raut |
🎬 Movie | Gulkand |
📝 Lyricist | Mandar Cholkar |
🎼 Composer | Avinash-Vishwajeet |
🕰️ Year | 2025 |
🧁 Genre | Love Song |
🏷️ Music Label | Everest Entertainment |
Chanchal Song Lyrics in Marathi
चंचल, वागतंय मन हे
अधीर का होतंय
मन वाटेवर स्वप्नांच्या
अडखळतंय पण सावरतंय
मन रात-रात भर वेडं जागतंय
चंचल, वागतंय मन हे
अधीर का होतंय
मन वळणावर वळताना
कधी हिरमुसतंय कधी हसतंय
मन खोल खोलवर ओढ लावतंय
कोडं सुटतय थोडं थोडं
नातं जुळतंय थोडं थोडं
जुळतंय तर जुळू दे ना
घडतंय जे घडू दे ना
मुरलेल्या गुलकंदाची आपली स्टोरी
कोडं सुटतय थोडं थोडं
नातं जुळतंय थोडं थोडं
जुळतंय तर जुळू दे ना
घडतंय जे घडू दे ना
मुरलेल्या गुलकंदाची आपली ही स्टोरी
नकळत का कुणात गुंतते मन असे
नकळत का वाटते आपलेपण पण असे
दरवळती गंध कसे
उलगडती बंध कसे
प्रेमाच्या रंगाची छटा नवी कोरी
चंचल, आज मन माझं
पाखरू झालं
तुझ्या मागं मागं उडतंय
पत्ता घरट्याचा विसरतंय
आभाळ हवं हवंसं शोधतंय
चंचल, आज मन माझं
पाखरू झालं
कधी लपतंय कधी कधी दिसतंय
रस्ता परतीचा हरवतंय
हळुवार दुवा नवासा जोडतंय
कोडं सुटतय थोडं थोडं
नातं जुळतंय थोडं थोडं
जुळतंय तर जुळू दे ना
घडतंय जे घडू दे ना
मुरलेल्या गुलकंदाची आपली ही स्टोरी
कोडं सुटतय थोडं थोडं
नातं जुळतंय थोडं थोडं
जुळतंय तर जुळू दे ना
घडतंय जे घडू दे ना
मुरलेल्या गुलकंदाची आपली ही स्टोरी
Written By: Mandar Cholkar